PCB Cricketer : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! खेळाडूला बसला मोठा फटका; २ वर्षांची बंदी अन् १० लाखांचा दंड

लाहोर: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शिस्तभंगाच्या आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका खेळाडूवर कठोर कारवाई केली आहे. पाकिस्तानचा देशांतर्गत क्रिकेटपटू हमजा नझर (Hamza Nazar) याच्यावर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन व्हिसा अर्ज केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय त्याच्यावर १० लाख रुपयांचा दंडही (PKR 1 Million) ठोठावण्यात आला आहे.



काय आहे संपूर्ण प्रकरण?


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माध्यमातून व्हिसासाठी अर्ज करताना हमजा नझरने अपूर्ण, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर पीसीबीने याची गंभीर दखल घेत एक तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीने संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेतला आणि हमजाला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली.


चौकशीत दोषी आढळल्यानंतर पीसीबीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. या दोन वर्षांच्या बंदीमुळे हमजा नझर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमधील कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.



कोण आहे हमजा नझर?




  • २७ वर्षीय हमजा नझर हा पाकिस्तानमधील एक अष्टपैलू (All-rounder) क्रिकेटपटू आहे.




  • त्याने अद्याप पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेले नाही.




  • त्याने आतापर्यंत १६ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ७४७ पेक्षा जास्त धावा केल्या असून २६ गडी बाद केले आहेत. तसेच लिस्ट ए आणि टी-२० सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.




बोर्डाने स्पष्ट केले आहे की, क्रिकेटच्या नियमांशी विसंगत असणारे आणि बोर्डाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात