India vs Sri Lanka: आजपासून तीन दिवसीय सराव सामना; टेस्ट मालिकेपूर्वी टीम इंडियाची रंगीत तालीम

श्रीलंकेत रंगणार भारत-श्रीलंका XI चा महासंग्राम! कधी आणि कुठे पाहाता येणार सामना? वाचा डिटेल्स


India vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध 15 ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघ आजपासून (7 ऑगस्ट) तीन दिवसीय सराव सामन्यात मैदानात उतरणार आहे. कोलंबोतील ऐतिहासिक नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब (NCC) मैदानावर भारताचा सामना श्रीलंका इलेव्हनशी होणार असून हा सामना 9 ऑगस्टपर्यंत रंगणार आहे. ( India vs Sri Lanka)

2017 नंतर प्रथमच भारत कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आला आहे. त्यामुळे सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंना श्रीलंकेतील धीम्या, फिरकीला पोषक खेळपट्ट्या आणि दमट हवामानाचा फारसा अनुभव नाही. अशा परिस्थितीत हा सराव सामना खेळाडूंना स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. (Team India)



मागील श्रीलंका दौऱ्याची आठवण भारतासाठी आनंददायी नव्हती. 2024 मध्ये झालेल्या वनडे मालिकेत श्रीलंकेने भारताला 3-0 अशी धूळ चारली होती. त्यामुळे यावेळी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ कोणतीही ढिलाई न ठेवता सराव सामन्यात दमदार कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. (Indian Cricket Team)


या सराव सामन्यात खेळाडूंच्या सहभागावर कोणतेही बंधन नसल्याने दोन्ही संघांना सर्व फलंदाज आणि गोलंदाजांना संधी देता येणार आहे. त्यामुळे युवा खेळाडू आकिब नबी, सारांश जैन आणि गुरनूर ब्रार यांच्याकडेही सर्वांचे लक्ष असेल. या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर ते कसोटी मालिकेच्या अंतिम संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. (India Shri Lanka Test Series)


सामन्याची माहिती




  • सामना: भारत विरुद्ध श्रीलंका इलेव्हन (सराव सामना)

  • तारीख: 7 ते 9 ऑगस्ट

  • ठिकाण: नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब (NCC), कोलंबो

  • वेळ: सकाळी 10:00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)


लाईव्ह प्रसारण




  • टीव्ही: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

  • लाईव्ह स्ट्रीमिंग: Sony LIV अॅप आणि वेबसाइट


भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन आणि आकिब नबी


श्रीलंका संघ

सोनल दिनुषा (कर्णधार), अंजाला बंडारा (यष्टिरक्षक), निशान मदुश्का, रविंदु रशांथा, पासिंदु सूरियाबंदारा, पवन रथनायके, अहान विक्रमासिंघे, निपुण धनंजय, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, असांका मनोज, इसिथा विजेशुंदरा, रमेश मेंडिस, केसरा नुवंथा आणि दिलुम सुदीरा
Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या