NCPSP : शरद पवार गटाचे सर्व खासदार सोमवारी पंतप्रधानांना भेटणार

सुप्रिया सुळे यांची माहिती; ‘एफसीआरए’ विधेयकाबाबत चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन


मुंबई : महाराष्ट्रातील पाणीटंचाईचा प्रश्न आणि विकासकामांच्या प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व आठही खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली.



सुळे यांनी सांगितले की, येत्या सोमवारी सकाळी ११ वाजता आमच्या पक्षाच्या आठही खासदारांचे शिष्टमंडळ नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. याशिवाय, आमच्या सर्व खासदारांच्या आपापल्या मतदारसंघातील विकासाच्या चौकटीतले अनेक महत्त्वाचे आणि प्रलंबित प्रश्न आहेत. राज्याच्या हिताच्या या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी या विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.



या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित एफसीआरए (फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट) विधेयकावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या बिलाला आमच्या पक्षाचा विरोध असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी कोणतीही घाई करू नये. लोकशाही मार्गाने संसदेत आणि संसदेबाहेर यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे. हे बिल आमच्यावर बळजबरीने लादू नका. जर परदेशातून चुकीचा पैसा येत असेल, ड्रग्जच्या माध्यमातून पैसा येत असेल किंवा अन्य काही देशविरोधी बाबी असतील, तर त्याला आमचाही पूर्ण विरोध आहे आणि सरकारने त्यावर कठोर कारवाई करावी. परंतु, जर काही संस्था किंवा लोक परदेशातून समाजोपयोगी कामांसाठी प्रामाणिकपणे मदत करू इच्छित असतील, तर त्याला अडचण काय? प्रत्येक गोष्टीकडे आणि मदतीकडे संशयाच्या किंवा वाईट नजरेने का पाहिले जावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या कायद्याच्या तरतुदींवर आम्ही सरकारसोबत संयुक्त चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२