Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वेची महातयारी ! भुसावळ विभागातील ५ स्थानकांचा होणार कायापालट

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी रेल्वे प्रवास मिळावा, यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मोठी तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येत आहे.



सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वेची महातयारी 


एकात्मिक रेल्वे विकास आराखड्यांतर्गत प्रवासी हाताळणी क्षमता वाढविणे, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करणे आणि कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे संचालन अधिक कार्यक्षम बनविणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. यापूर्वी कुंभमेळ्यातील बहुतांश प्रवासी वाहतूक नाशिक रोड स्थानकावर केंद्रित होत होती. यंदा मात्र बहु-स्थानक प्रवासी व्यवस्थापनाची संकल्पना राबविण्यात येत असून, त्यामुळे भाविकांची विविध स्थानकांवरून ये-जा सुलभ होण्याबरोबरच गर्दीचे समतोल नियोजन आणि सुरक्षिततेतही वाढ होणार आहे.



नाशिक रोडवरील गर्दीचा ताण कमी होणार


यापूर्वी कुंभमेळ्यातील बहुतांश प्रवासी वाहतूक नाशिक रोड स्थानकावर केंद्रित होत होती. मात्र, यंदा प्रथमच बहु-स्थानक प्रवासी व्यवस्थापनाची संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे भाविकांना वेगवेगळ्या स्थानकांवरून प्रवास करता येणार असून, नाशिक रोडवरील गर्दीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. या पाचही स्थानकांवर नवीन पादचारी पूल, अतिरिक्त फलाट, कायमस्वरूपी आणि तात्पुरते होल्डिंग एरिया, विस्तारित प्लॅटफॉर्म शेड, प्रशस्त सर्क्युलेटिंग एरिया, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश अशा विविध सुविधा उभारण्यात येत आहेत.



देवळाली स्थानकावर विशेष सुविधा


दक्षिणेकडून येणाऱ्या भाविकांसाठी देवळाली स्थानक महत्त्वाचे आगमन व निर्गमन केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथे दोन नवीन रॅम्पयुक्त पादचारी पूल, २४ डब्यांच्या रेल्वेसाठी उच्चस्तरीय फलाट, विद्यमान फलाटाचा विस्तार, अतिरिक्त लूप लाईन्स तसेच सुमारे ९,४३५ चौरस मीटर क्षेत्रफळाचे प्लॅटफॉर्म शेड उभारले जात आहे. नाशिक रोड स्थानकावर १२ मीटर रुंदीचा रॅम्पयुक्त पादचारी पूल, स्वतंत्र प्रवेश-निर्गमन मार्ग, विस्तारित सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग सुविधा, फलाटांचा विस्तार आणि विशेष कुंभमेळा नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे.



ओढा स्थानकावर विशेष रेल्वेंची तयारी


ओढा स्थानक विशेष रेल्वेगाड्यांच्या स्टेबलिंग केंद्राच्या स्वरूपात विकसित होत असून, अतिरिक्त आयलंड फलाट, दोन पादचारी पूल, नवीन लूप लाईन्स आणि स्टेबलिंग सुविधा उभारल्या जात आहेत. खेरवाडी स्थानकाचा आधुनिक प्रवासी केंद्र म्हणून विकास करण्यात येत आहे. येथे २४ डब्यांच्या रेल्वेसाठी दोन नवीन उच्चस्तरीय फलाट, ६ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल, सुमारे १५,७०० चौरस मीटर कव्हर शेड, कायमस्वरूपी होल्डिंग एरिया आणि विस्तारित सुविधा उभारण्यात येत आहेत. या कामांमुळे प्रवासी हाताळणी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.



पाचही रेल्वे स्थानके नियमितपणे कार्यरत


दरम्यान, ही सर्व कामे सुरू असतानाही पाचही रेल्वे स्थानके नियमितपणे कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी विकासकामांच्या काळात रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. एकूणच, सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून नाशिक रोडपुरती मर्यादित गर्दी न ठेवता पाच स्थानकांवर प्रवासी भार विभागण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुविधायुक्त करण्याचा प्रयत्न आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून