Pune Pub Raid : पहाटे ३ वाजेपर्यंत पार्टी रंगणाऱ्या पबवर पोलिसांची धाड! ८० ते १०० तरुण-तरुणी ताब्यात

पुणे : पुण्यातील पब आणि क्लबमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. विमानतळ परिसरातील प्रसिद्ध ‘द हौज कम्युन’ (The Haus Commune) या पबवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे सुमारे ३ वाजता अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पबमध्ये मोठ्या प्रमाणात पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. प्रशासनाने पब सुरू ठेवण्यासाठी रात्री दीड वाजेपर्यंतची मुदत दिलेली असताना संबंधित पब पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. (Pune Pub Raid)



डान्स फ्लोअरवर ८० ते १०० जण :


पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी पबच्या डान्स फ्लोअरवर तब्बल ८० ते १०० तरुण-तरुणी उपस्थित असल्याचे आढळले. डीजेच्या तालावर पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी उपस्थित तरुण-तरुणींना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली. या प्रकरणात पबचा चालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Pub Raid)



गुप्त माहिती मिळताच गुन्हे शाखेची धडक कारवाई :


विमानतळ परिसरातील या पबमध्ये परवानगीच्या वेळेपेक्षा अधिक काळ पार्टी सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास अचानक कारवाई केली. छाप्यावेळी पबमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी नियमांचे उल्लंघन झाल्याची बाब गांभीर्याने घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. (Pune Pub Raid)



पहाटेपर्यंत पब सुरू ठेवण्याची परवानगी कुणाची?


पुणे शहरातील पब आणि क्लबच्या वेळांबाबत प्रशासनाने नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, असे असताना हा पब पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू कसा होता, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. याशिवाय पबमध्ये दारू विक्रीसाठी आवश्यक परवाने होते का, तसेच नियमांचे अन्य कोणते उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे. (Pune Pub Raid)



पब चालक आणि व्यवस्थापनाकडून वेळेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्यास त्यांच्यावर संबंधित कायद्यांतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येणार आहे. (Pune Pub Raid)

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,