World Tribal Day : वनरंग-2026मधून आदिवासी संस्कृतीचा जागर; छगन भुजबळांकडून समाजाच्या योगदानाचे कौतुक

मुंबई : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘आदिवासी संस्कृती उत्सव-वनरंग 2026’चे आयोजन करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आदिवासी समाजाच्या कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे कौतुक केले. आदिवासी संस्कृती ही भारताच्या समृद्ध वारशाचा महत्त्वाचा भाग असून, ती जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (World Tribal Day)

या कार्यक्रमाला अभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रिया बेर्डे, पद्मश्री राहीबाई पोपरे, पद्मश्री भिकल्या धिंडा, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार हिना गावित, अभिनेते भरत गणेशपुरे आणि गौरव मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजातील कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. पद्मश्री तारपा वादक भिकल्या धिंडा यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच डॉ. अनबलगन पी., गिर्यारोहक अनिल वसावे आणि स्वदेश फाऊंडेशन यांना आदिवासी भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ( Maharashtra)

यावेळी ‘नवरंग’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. आदिवासी कलादालन आणि साहित्य प्रदर्शनालाही मान्यवरांनी भेट दिली. पारंपरिक लोकसंगीत, तारपा नृत्य, विविध लोकनृत्य आणि हस्तकलेच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ( Chhagan Bhujbal)



आदिवासी समाजाने स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. बिरसा मुंडा, तंट्या भिल आणि राघोजी भांगरे यांसारख्या क्रांतिकारकांनी अन्यायाविरोधात लढा दिला. आदिवासी समाजाने जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.

आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि विकासाचा स्वीकार करताना आदिवासी समाजाने आपली भाषा, लोककला आणि परंपरा जपावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले. ‘वनरंग-2026’सारख्या उपक्रमांमुळे आदिवासी संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त त्यांनी देशभरातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत पर्यावरणाचे रक्षण आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला. ( Tribal community)

 
Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा