Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची घोषणा करत असून या पर्वातून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या येण्यामुळे या लोकप्रिय कार्यक्रमात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे आणि नव्या विचारांचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा प्रवास सुरू होणार आहे कारण 'आता खेळ बदलणार'... (Madhuri Dixit)

महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेल्या या प्रतिष्ठित मंचावर आता अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचलिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता त्या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत. (Kon Honar Karodpati)



ज्ञानाच्या बळावर स्वप्नांना नवी दिशा देणारा, सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाला व्यासपीठ देणारा आणि प्रत्येक प्रश्नातून आयुष्य बदलण्याची संधी निर्माण करणारा हा कार्यक्रम यंदाही प्रेरणांचा, आशांचा आणि नव्या शक्यतांचा उत्सव ठरणार आहे.

'कोण होणार करोडपती' एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे. ज्ञानाची, जिद्दीची आणि स्वप्नांची परंपरा कायम असली तरी यंदा माधुरी दीक्षित यांच्या येण्यानं या मंचावर नवा दृष्टीकोन, नवी ऊर्जा आणि एक वेगळी उब अनुभवायला मिळणार आहे... कारण 'आता खेळ बदलणार...!' (Kon Honar Karodpati)


या नव्या प्रवासाविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाल्या...


‘कोण होणार करोडपती' हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबांच्या आशांचा, स्वप्नांचा आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव आहे. अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि त्याच्या स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार होण्याची संधी मला मिळते आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ज्ञानाच्या बळावर सामान्य माणूस आपली असामान्य स्वप्नं कशी पूर्ण करू शकतो याचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. जिद्दीचा, चिकाटीचा आणि 'एका संधीमुळे आयुष्य बदलू शकतं' या विश्वासाचा हा कार्यक्रम आहे.
Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ