MHADA Thane : ठाण्यात म्हाडाची घरं आता स्वस्त! ४४ ते ४६ लाखांत मिळणार सदनिका; नव्याने निघणार लॉटरी

ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती आता कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या गृहप्रकल्पातील सदनिका आता अंदाजे ४४ ते ४६ लाख रुपयांत उपलब्ध होणार आहेत.


चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पात एकूण १,१७३ घरे उपलब्ध आहेत. यापैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी काढण्यात आली होती. त्यावेळी २०२५-२६ च्या रेडी रेकनर दरानुसार घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही सदनिकांच्या किमती ५१ ते ५२ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या.



दरम्यान, या घरांना २०२०-२१ मध्ये अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाले होते. त्यावेळी सदनिकांची किंमत सुमारे ४४ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, २०२५-२६ मध्ये पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उर्वरित सदनिकांच्या किमती वाढवण्यात आल्या. एकाच इमारतीतील समान क्षेत्रफळाच्या घरांसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या.


या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२०-२१ चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून सर्व सदनिकांच्या किमती निश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच, आधीच्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांनी स्वीकृती पत्रे जमा केली असल्याने त्यांचे लाभ कायम ठेवण्यात येणार आहेत.


उर्वरित सदनिकांसाठी आता सुधारित दरानुसार नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यात परवडणाऱ्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, नव्या लॉटरीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर