Nandurbar : विदारक ! प्रसूतीसाठी गर्भवतीला बांबूच्या झोळीतून पायी नेण्याची वेळ

Nandurbar : नंदुरबारच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना अक्कलकुवा तालुक्यात समोर आली आहे. गावात पक्का रस्ता नाही, मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेशी संपर्कही होत नाही. अशा परिस्थितीत प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला ग्रामस्थांनी चक्क बांबूची झोळी करून खांद्यावरून पायी रुग्णालयाच्या दिशेने नेलं. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. (Nandurbar News)



नेमकं काय घडलं !


अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील देलबारी, वेहगी परिसरातील बारीपाडा येथील २८ वर्षीय उषा दिनेश तडवी (Usha Dinesh Tadvi) यांना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तात्काळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधता आला नाही. दुसरीकडे, गावाला जाण्यासाठी पक्काच रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणेही शक्य नव्हते. त्यातच गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणार तरी कशी ? गावाच्या मध्यातून देवनदी वाहत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. (Nandurbar News)



माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित


अखेर ग्रामस्थांनी बांबूची झोळी तयार केली. आणि झोळीत उषा तडवींना झोपवून पक्क्या रस्त्यापर्यंत नेण्यास सुरुवात केली. परंतु, पक्क्या रस्त्यापर्यंत पोहोचण्याआधीच वाटेत महिलेची प्रसूती झाली. यानंतर महिला आणि नवजात बाळाला वेहगीहून पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Pimpalkhuta Primary Health Centre) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून त्यानंतर प्रतिक्रिया देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे (Dr. Ravindra Sonawane) यांनी दिली आहे. (Nandurbar News)


दरम्यान, एकीकडे शासनाकडून दुर्गम आदिवासी भागाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही एखाद्या गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी बांबूची झोळी आणि ग्रामस्थांच्या खांद्याचा आधार घ्यावा लागत असेल, तर विकास नेमका कोणाचा झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.