Nashik Crime : नाशिकच्या पर्यटनाला टवाळखोरांचं ग्रहण ! हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड

Nashik Crime News :  नाशिकच्या पर्यटनाला टवाळखोरांची नजर लागल्याचं चित्र आहे. भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्रकार आजही नाशिककर विसरले नाहीत. अशातच पुन्हा एकदा हरिहर किल्ल्यावरून (Harihar Fort) परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अडवून मारहाण आणि दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नाशिकच्या पर्यटन मार्गावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)



नेमकं काय घडलं ?


पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पर्यटक हरिहर किल्ल्यावरून वाहनाने परतत होते, याचदरम्यान, मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर संबंधितांनी मोटारसायकलवरून पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर वावी हर्ष परिसरात पर्यटकांची थेट गाडी अडवण्यात आली. त्यावेळी आरोपींनी चालक आणि वाहनातील प्रवाशांना शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यात चालक आणि प्रवाशांना काठी तसेच चापटीने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. (Nashik Crime News)



शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी


आरोपींनी वाहनावर दगडफेक केल्याचा देखील आरोप आहे. दगडफेकीमुळे गाडीच्या समोरील काचेचे आणि साईड मिररचे नुकसान झाले असून वाहनाचे छत आणि बंपर देखील काठी आणि दगडांनी फोडल्याचा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Nashik Crime News)



10 जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा


पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांसोबतच हा प्रकार घडल्याने त्र्यंबकेश्वर-घोटी पर्यटन मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. पोलिसांनी कारवाई करत तासाभरात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.  

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण