Nitesh Rane : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीत बसण्याची प्रत्येकाला इच्छा

- मंत्री नितेश राणे; जयंत पाटील-मुख्यमंत्र्यांच्या एकत्र प्रवासावर भाष्य


मुंबई : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत प्रवास करण्याची आणि त्यांचा सहवास लाभण्याची इच्छा राजकीय वर्तुळातील प्रत्येकाचीच असते. 'देवाभाऊं"चा सहवास लाभणे म्हणजे स्वतःचे भविष्य घडवण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या प्रवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मनात योग्य विचार येतील", अशी प्रतिक्रिया राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी दिली.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रविवारी मुंबई ते कोल्हापूर असा एकाच विमानाने एकत्र प्रवास केला. या अनपेक्षित एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासावर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खुसखुशीत प्रतिक्रिया दिली.



नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या गाडीत किंवा विमानात बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ आणि अभ्यासू नेत्यासोबत प्रवास मिळणे ही राजकीय दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केला असेल, तर त्यातून त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी योग्य विचार येतील", अशी प्रतिक्रिया त्यांनी (Nitesh Rane) दिली.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण