ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. वेतनाला झालेल्या विलंबानंतर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. (ST Emlpoyees Salary)


एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेपर्यंत अदा केले जाते. मात्र, यंदा सलग आलेल्या सुट्ट्या आणि प्रशासकीय प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे जुलै महिन्याचे वेतन वेळेत जमा होऊ शकले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. (ST News)



एसटी महामंडळाकडून शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीची माहिती नियमितपणे वित्त विभागाला दिली जाते. जुलै महिन्याची माहितीही वेळेत सादर करण्यात आली होती. मात्र, प्रतिपूर्तीची रक्कम मिळण्यास विलंब झाल्याचा परिणाम वेतन वितरणावर झाला. (Pratap Sarnaik)


कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर मिळावे यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला. त्यानंतर प्रतिपूर्तीच्या रकमेबाबतचा शासन निर्णय 10 ऑगस्ट रोजी प्राप्त झाला. त्यामुळे 11 ऑगस्टला सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Maharshtra News)


दरम्यान, वेतनाला होणाऱ्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होतो. विशेषतः गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कर्जांचे हप्ते वेळेत न भरल्यास दंड किंवा अतिरिक्त व्याजाचा भार कर्मचाऱ्यांवर पडू शकतो. त्यामुळे भविष्यात वेतन वितरणात कोणताही विलंब होऊ नये, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (ST Bus)


एसटी प्रशासन आणि वित्त विभागाने यापुढे अधिक चांगल्या समन्वयाने काम करून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत त्यांच्या खात्यात जमा होईल, याची काळजी घ्यावी, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी