Nagpur News : धक्कादायक! मोहन भागवतांचा ताफा गेल्यानंतर काही मिनिटांतच तरुणावर हल्ला

नागपूर : नागपुरातील महाल (Mahal) परिसरातील बडकस चौकात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयापासून सुमारे 200 मीटर अंतरावर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या काही मिनिटांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांचा ताफा याच परिसरातून गेला होता. (Nagpur)


मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडकस चौक परिसरातील एका गल्लीत हा हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीने अचानक एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याची माहिती आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. (RSS Office)



हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार त्याची प्रकृती स्थिर आहे. (Crime News)


घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी तपास पथके कामाला लागली आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वादातून हा हल्ला झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. (Attack News)


RSS मुख्यालय परिसर हा सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. त्यातच मोहन भागवत यांचा ताफा या भागातून गेल्यानंतर काही मिनिटांत हल्ल्याची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Nagpur Crime)


भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे महाल आणि बडकस चौक परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने