Simhastha KumbhMela : कुंभमेळ्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सज्ज, शिर्डी, शनिशिंगणापूरमध्ये पर्यायी पार्किंगची तयारी

Ahilyanagar : नाशिक कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून शिर्डी आणि शनिशिंगणापूरसाठी विशेष नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. कुंभमेळ्यादरम्यान या दोन्ही धार्मिक स्थळांवर मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची वाहतूक, वाहनतळ, रस्ते आणि नागरी सुविधांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (District Collector Dr. Pankaj Ashiya) यांनी दिल्या आहेत.



विकासकामांना गती देण्याचे निर्देश


चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर येथे प्रस्तावित विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (District Collector Dr. Pankaj Ashiya) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत चौंडी, शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील विविध विकास कामांचे नियोजन, प्रस्तावित कामांची सद्यस्थिती आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.



भाविकांसाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था


शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था उभारण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. संभाजीनगर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक पार्किंगची जागा निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. घोडेगाव एमआयडीसी परिसरात पार्किंगसाठी किती जमीन उपलब्ध होऊ शकते आणि या ठिकाणी किती वाहनांची पार्किंग क्षमता निर्माण करता येईल, याची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.



प्रलंबित रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश


दरम्यान, शिर्डी शहरातील प्रलंबित रस्त्यांची कामेही वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या इतर विकासकामांची पाहणी करून त्यांचे प्रस्तावही तातडीने सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नाशिक कुंभमेळ्यामुळे शिर्डी आणि शनिशिंगणापूरमध्ये वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी टाळणे, वाहनांची योग्य पार्किंग व्यवस्था करणे आणि रस्ते व इतर नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी