Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थानचा व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय

Nashik : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात शिवभक्तांची श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठी गर्दी होत असते. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाबाबत देवस्थान ट्रस्टच्या वतीने काही नियम करण्यात आले आहेत. राज्य शिष्टाचारासंबंधी लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दर्शन १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत बंद करण्यात आले आहे. (Trimbakeshwar Temple VIP Darshan)



१३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर व्हीआयपी दर्शन बंद


श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. त्याचा प्रशासनावर येणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी आणि प्रश्नांचा विचार करून श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचेसांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यात मंदिरात होणारी गर्दी आणि भाविकांना दर्शनासाठी लागणारा वेळ लक्षात घेता भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.



अतिमहत्त्वाच्या संख्येवरही विभागनिहाय मर्यादा


श्रावण महिन्याच्या अनुषंगाने केंद्रीय, राज्य स्तरावरून अथवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचारासंबंधीच्या लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दर्शन १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहे. तसेच शासकीय विभागांकडून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवरही विभागनिहाय मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार दररोज केवळ सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ या निश्चित वेळेत अतिमहत्त्वाच्या २० व्यक्तींनाच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. (Trimbakeshwar Temple VIP Darshan)


गर्दीच्या काळात भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे, तसेच मंदिर प्रशासनावरील अतिरिक्त ताण कमी व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण