CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ


मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या धोरणात राज्य शासनाने सुधारणा केली आहे. या अंतर्गत विविध राजकीय व सामाजिक आंदोलनांमधील ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ मार्च, २०२७ पर्यंत दोषारोपपत्रे (चार्जशीट्स) दाखल होतील, असे खटले आता कायदेशीर तरतुदींनुसार मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, यामुळे हजारो राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांना, विशेषतः दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या मोर्चांमधील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



सार्वजनिक हिताच्या किंवा विविध सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून घेराव घालणे, मोर्चे काढणे व निदर्शने करणे यांसारखे आंदोलनाचे मार्ग अवलंबले जातात. अशा वेळी कार्यकर्त्यांवर दाखल होणारे खटले मागे घेण्यासाठी शासनाने यापूर्वी २१ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्या नियमानुसार ३१ जुलै २०२६ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले खटलेच मागे घेण्यास मंजुरी देण्यात आली होती. तथापि, ही मुदत संपल्यामुळे आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची मोठी संख्या पाहता, या कालावधीत वाढ करण्याची बाब गेल्या काही काळापासून शासनाच्या विचाराधीन होती. अखेर गृह विभागाने यामध्ये सुधारणा करत ही मुदत दीड वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च, २०२७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


या सुधारित निर्णयामध्ये राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची बाब समाविष्ट केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि तीव्र आंदोलने झाली होती. या आंदोलनांमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थी, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्या वेळी झालेल्या कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी अनेक आंदोलक तरुण आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या न्यायालयीन खटल्यांमुळे अशा आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिक भविष्य धोक्यात येऊ नये, हा संवेदनशील दृष्टिकोन समोर ठेवून त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले हे सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या