Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार नाशिक जिल्हा मुख्यालयी भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन, तर रायगड जिल्हा मुख्यालयी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांना अद्यापही पालकमंत्री लाभलेले नसले, तरी मागील प्रजासत्ताक दिनाचा (२६ जानेवारी) फॉर्म्युला कायम ठेवत मुख्यमंत्र्यांनी महाजन आणि गोगावले यांच्यावरच ही जबाबदारी सोपवली आहे. ( Bharat Gogawale)


सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने बुधवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे पार पडणार आहे. तर पुणे येथील मुख्य शासकीय समारंभात राज्याचे राज्यपाल ध्वजारोहण करतील. ( Girish Mahajan)



रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये बऱ्याच काळापासून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आदिती तटकरे यांच्यासाठी तर शिवसेनेने भरत गोगावले यांच्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय शिष्टाचाराची कोंडी फोडण्यासाठी शासनाने दोन्ही जिल्ह्यांचे तात्पुरते नियोजन केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्याची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे, तर नाशिक जिल्ह्याची कमान गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण येथे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, असेही निश्चित करण्यात आले आहे.


या यादीनुसार राज्यातील ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे, तर बीड येथे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होईल. याशिवाय सिंधुदुर्ग येथे नितेश राणे, अहिल्यानगर येथे राधाकृष्ण विखे-पाटील, सांगली येथे चंद्रकांत पाटील आणि मुंबई उपनगर येथे आशिष शेलार यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात तिरंगा फडकवला जाणार आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने