Jalgaon Crime : रस्त्यावर मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ

Jalgaon Crime : जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरात मंगळवारी धाकादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे रस्त्यावर पुरुष जातीचं मृत अर्भक आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रक्तानं माखलेल्या अवस्थेत अर्भक आढळल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. अर्भक रस्त्यावर कसं आलं आणि ते तिथं कोणी आणून टाकलं? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.



नेमकी घटना काय घडली ?


शहरातील आंबेडकरनगर या दाट लोकवस्तीच्या भागातील एका गल्लीत मंगळवारी पहाटे नागरिकांना रस्त्यावर रक्ताने माखलेले मृत अर्भक दिसून आले. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे (Shanipeth Police Station) पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक ते पुरावे गोळा केले आणि पंचनामा केला.


दाट लोकवस्ती असलेल्या या गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने हे अर्भक टाकून तेथून काढता पाय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पहाटेच्या सुमारास परिसरातून कोणाची ये-जा झाली होती, कोणती संशयास्पद हालचाल नागरिकांच्या निदर्शनास आली का, तसंच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून काही माहिती मिळते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे



अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल


दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शनिपेठ पोलीस पुढील तपास करत आहेत. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याचा जन्म कुठे झाला आणि त्याला येथे कोणी आणून टाकलं, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. फॉरेन्सिक तपासातून मिळणारे पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मृत अर्भक रस्त्यावर आढळल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी