Nashik : मालेगावात अत्याधुनिक भूकंप मापक केंद्र सुरू

Nashik : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने होणारे भूकंपाचे धक्के चिंतेची बाब ठरत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सातत्याने जाणवणाऱ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मालेगावसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयातर्फे (The Central Government's Ministry of Science) येथील महाराजा सयाजीराव गायकवाड (एमएसजी) महाविद्यालयात भूकंप मापक केंद्र (Seismometer Center) सुरू करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ​या केंद्रामुळे फक्त मालेगाव किंवा नाशिक जिल्हाच नाही, तर संपूर्ण भारत आणि देशालगतच्या सीमावर्ती भागातील भूकंपाच्या सूक्ष्म हालचालींची त्वरित नोंद घेता येणार आहे. ​



मेरी, दळवट येथे भूकंपमापक यंत्रे कार्यरत


मागील काही दिवसांत नाशिक जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के सातत्याने जाणवत आहेत​. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने भूगर्भातील हालचालींची नोंद होण्याची प्रकर्षाने गरज समोर आली. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात सुरगाणा (Surgana), हरणबारी (Haranbari) व मालेगाव (Malegaon) येथे भूकंप मापक केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सुरगाणा व मालेगाव येथील केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. जिल्ह्यात ‘मेरी’ आणि दळवट येथे आधीपासूनच भूकंपमापक यंत्रे कार्यरत आहेत.



भूकंप संशोधन केंद्र २४ तास कार्यरत राहणार


केंद्र शासनाचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (विज्ञान मंत्रालय) आणि एमएसजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विज्ञान मंत्रालयाने या केंद्रासाठी अतिशय प्रगत आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे. ​राष्ट्रीय भूकंप केंद्राचे वैज्ञानिक डॉ. ए. पी. सिंह, प्रभात पांडे, नितीनकुमार सिंग आणि मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ​हे भूकंप संशोधन केंद्र २४ तास अहोरात्र कार्यरत राहणार आहे. अचानक येणाऱ्या भूकंपाच्या तीव्रतेची तात्काळ माहिती मिळणार असल्याने भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

‘शिळ्या कढीला ऊत आणू नका!’ आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा...

पुणे : “सुषमाताई अंधारे यांनी मला अभ्यासू आमदार असल्याचे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने वडिलांसोबत शेअर केले खास क्षण; कॅप्शन एकदा पहाच...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सोशल मीडियावर एका नवीन पोस्टद्वारे आपले वडील सलीम खान यांच्यासोबतच्या नात्याची

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Ashish Shelar: दिवंगत नाना पाटेकरांना भाजपने दिली होती लोकसभा लढवण्याची ऑफर, मंत्री आशिष शेलार यांचा दावा

 देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः भेट घेतल्याची सांगितली आठवण मुंबई : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून

New Mahindra Car Launch: महिंद्राची नवी CNG SUV बाजारात! पाहा किंमत, फीचर्स आणि मायलेज

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीने आपल्या ताफ्यात सीएनजी गाडी लाँच केली आहे. XUV 3XO CNG ही