Plastic Currency : चलनात येणार १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० रुपये आणि २० रुपये मूल्याच्या प्रत्येकी एक अब्ज प्लास्टिक बँक नोटांना फील्ड ट्रायलसाठी व्यवहारात आणण्यास मंजुरी दिली आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला होता. ट्रायल यशस्वी झाल्यास या दोन्ही मूल्यांच्या पॉलिमर नोटा नियमितपणे जारी केल्या जाऊ शकतील. पॉलिमर नोटा कागदी नोटांच्या तुलनेत अधिक टिकाऊ मानल्या जातात आणि यामध्ये सुरक्षेशी संबंधित काही अतिरिक्त वैशिष्ट्येही समाविष्ट केली जाऊ शकतात.



ग्राहक मूल्य निर्देशांकांद्वारे मोजली जाणारी सरासरी किरकोळ महागाई २०२३-२४ मध्ये ५.४% होती, जी घटून २०२४-२५ मध्ये ४.६% आणि २०२५-२६ मध्ये २.१% वर आली. तथापि, २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत ती वाढून ३.९% झाली. असे असले तरी महागाईचा दर आरबीआयच्या ४ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा खालीच राहिला असल्याचे दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात वित्तमंत्र्यांनी सांगितले.


जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत जीएसटी रचनेचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या अंतर्गत मानक दर १८ टक्के, गुणवत्ता दर (मेरिट रेट) ५ टक्के आणि काही निवडक वस्तू व सेवांसाठी ४० टक्के असा विशेष डी-मेरिट दर ठेवण्यात आला आहे, असे आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना वित्तमंत्री सीतारामण यांनी सांगितले



कम्युनिस्टांविरोधातील वित्तमंत्र्यांचे वक्तव्य कामकाजातून हटवले


राज्यसभेत कम्युनिस्ट पक्षांविरोधात वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या वक्तव्याचा भाग सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी सभागृहाच्या कामकाजाच्या रेकॉर्डवरून हटवला. वित्तमंत्र्यांनी सोमवारी वरिष्ठ सभागृहात 'कर आकारणी आणि इतर कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२६' वरील चर्चेदरम्यान माकपा खासदार जॉन ब्रिटास यांच्यावर निशाणा साधताना कम्युनिस्टांबद्दल वक्तव्य केले होते. सरकार यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार असल्याचा दावा करून ब्रिटास यांनी खोटी माहिती पसरवली, असा आरोपही वित्तमंत्र्यांनी केला होता. कम्युनिस्टांविषयी वित्तमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत भाकपा नेते पी. संदोष यांनी हे वक्तव्य कामकाजातून हटवण्याची मागणी केली होती. एखाद्या मंत्र्याचे वक्तव्य संसदेच्या रेकॉर्डवरून हटवले जाणे ही सामान्य बाब नाही. मात्र, याच अधिवेशनात लोकसभा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचीही काही वक्तव्य हटवण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी