Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय


मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य दिले जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये 'शासन प्रक्रिया पुनर्रचना' राबविण्यात येणार असून, या विभागाच्या पूर्वीच्या १५ सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता १० करण्यात आली आहे. दस्तनोंदणी, विवाह नोंदणी आणि प्रमाणित नकला मिळविण्याची प्रक्रिया आता अत्यंत सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण बदल केला. (Chandrashekhar Bawankule)


या नव्या प्रणालीनुसार, समान स्वरूपाच्या अनेक सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. संगणकीकृत प्रणालीतून दस्तांची प्रमाणित नक्कल देण्याच्या तीन वेगवेगळ्या सेवा एकत्र करून त्यांची एकच सेवा तयार करण्यात आली आहे, तर विशेष विवाह कायद्यांतर्गत येणाऱ्या दोन सेवांचेही एकत्रीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करणे आणि सीलबंद मृत्यूपत्राचा लखोटा जमा करणे यांसारख्या सेवा आता काढून टाकण्यात येणार आहेत. (Chandrashekhar Bawankule)



नव्या बदलांनुसार, नागरिकांना आता वारंवार तीच कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. डिजीलॉकर, आधार, पॅन आणि भूमी अभिलेख यांसारख्या शासकीय प्रणालींशी ही सिस्टीम जोडली जाणार असल्यामुळे आवश्यक माहिती आपोआप घेतली जाईल. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही, तेथे नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या 'गृहभेटीचे' सध्याचे ३०० रुपये शुल्क वाढवून ते ५००० रुपये करण्यात आले आहे. यासोबतच अभिलेख शोधासाठीचे दरही नव्याने सुचवण्यात आले आहेत. (Chandrashekhar Bawankule)


दस्तनोंदणी आणि नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करणे यांसारख्या सेवा आता केवळ १ दिवसात पूर्ण केल्या जातील, अशी सुधारित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही संपूर्ण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी, 'आपले सरकार' आणि 'मैत्री' पोर्टलशी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रणालीचे 'एपीआय'द्वारे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने