Anna Bansode : अनधिकृत बांधकामाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. या कारवाईत दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेत. अनधिकृत बांधकामांबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल २८ ते २९ ऑगस्टपर्यंत सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले. (Anna Bansode)


विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ व दुर्लक्ष करणाऱ्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील दालनात बैठक झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी तसेच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण संबंधित अधिकारी उपस्थित होते.


कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील वळीवडे, उंचगाव, गांधीनगर, चिंचवाड व मुडशिंगी या गावांमधील विनापरवाना बांधकामांबाबत प्राप्त तक्रारींची बैठकीत सविस्तर माहिती घेण्यात आली. संबंधित बांधकामांना यापूर्वी बजावलेल्या नोटिसा, केलेले पंचनामे, दाखल केलेले गुन्हे तसेच न्यायालयीन प्रकरणांची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. (Anna Bansode)



अनधिकृत बांधकामांवर केवळ नोटिसा बजावून किंवा जुजबी कारवाई करून प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार पुढील कठोर कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले. कारवाईस विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती चौकशी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


अनधिकृत बांधकामांबाबत आवश्यक त्या नोटिसा काढून पुढील कार्यवाही करावी. तसेच अशा इमारतींमधील घरांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी संबंधित उपनिबंधकांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.


अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कायद्यानुसार कार्यवाही करावी. प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील अशा सर्व बांधकामांची तपासणी करून त्याबाबतची संपूर्ण माहिती आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल २८ ते २९ ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Anna Bansode)


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी