Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 2 ते 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Sangli Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, विट्याहून आटपाडी घाटाच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि विजापूरहून मेढा, सातारा येथे जाणारी एसटी बस रेणावी घाटातील एका तीव्र वळणावर समोरासमोर आल्या. यावेळी दोन्ही बसमध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. काही प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.



अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पोलिस आणि बचाव पथकाच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.


या अपघातामुळे रेणावी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही बस बाजूला करण्याचे काम सुरू केले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. चालकाचा वेग, घाटातील तीव्र वळण किंवा बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का, या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. अपघाताची अधिकृत माहिती आणि मृत-जखमींची संख्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


 
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी