Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.


घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि पंजाबच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सुखबीर सिंग बादल लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही शिंदे यांनी व्यक्त केली.



घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदे यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशीही फोनवरून संपर्क साधला. त्यांनी घटनेचा सविस्तर आढावा घेत पोलिसांना हल्ल्याचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. तसेच बादल यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहिली असल्यास त्याचीही चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


धार्मिक किंवा सामाजिक ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक घटनांना महाराष्ट्रात किंवा देशात कोणतीही जागा नसल्याचे शिंदे यांनी म्हटले. या प्रकरणातील हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. तपासाअंती गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक दोषीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


‘कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही’


धार्मिक स्थळांची पवित्रता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने