Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’


मुंबई : राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, उद्योजकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. राज्यातील विविध धोरणांमध्ये संशोधन व विकास, स्वदेशी घटक निर्मिती, चाचणी, पेटंट तसेच अनुदानाबाबत असलेल्या तरतुदी एकत्रित करून ड्रोन उद्योगासाठी ‘पॉलिसी ऑफ पॉलिसीज’ तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.



ड्रोन क्षेत्रातील उद्योजकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीला मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, पोलिस महासंचालक सदानंद दाते, प्रधान सचिव डॉ.पी. अन्बलगन, सचिव विरेंद्र सिंह यांच्यासह ड्रोन उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ड्रोन क्षेत्रातील संशोधन व विकास आणि स्वदेशी घटक निर्मितीला विशेष प्रोत्साहन देण्यावर भर देताना विविध धोरणांमधील संशोधनासाठीच्या आर्थिक तरतुदी एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. उद्योजकांना संशोधन, विकास आणि चाचणीसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा एकत्रित लाभ मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.


राज्यात आधीपासून कार्यरत असलेल्या ड्रोन उद्योगाच्या परिसंस्थेला बळकटी देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन उद्योग आकर्षित करण्यासोबतच विद्यमान उद्योगांकडे दुर्लक्ष होता कामा नये. प्रयोगशाळा आणि चाचणी सुविधा उपलब्ध होईपर्यंत विद्यमान संस्थांना चाचणी खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याची शक्यता तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर येथील इंडस्ट्रियल सिटी परिसरात ‘ड्रोन सिटी’ विकसित करण्याच्या कामाला गती द्यावी. ड्रोन उद्योगासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यासाठी पुढील दोन-तीन वर्षांसाठी विशेष प्रोत्साहन धोरणाचा विचार करण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ड्रोन उद्योगासाठी टेस्टिंग रेंज, पेटंट खर्चासाठी सहाय्य तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा एकत्रित लाभ उद्योजकांना मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
.........
ड्रोन उद्योजकांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन होणार
- राज्याचे ड्रोन धोरण हे सर्वसमावेशक असून, धोरण जाहीर होण्यापूर्वीच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक आणि उद्योजकांचाही विचार करण्यात आला आहे. ड्रोन उद्योजकांनी यापूर्वी केलेल्या कामाचे योग्य मूल्यमापन करून त्यांना विद्यमान धोरणाच्या चौकटीत संधी देण्यात येईल, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
- ड्रोन क्षेत्रातील स्वदेशीकरणाला मोठ्या प्रोत्साहन देण्याचे राज्याचे उद्दिष्ट असून यासाठी आवश्यक पाठबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच विविध विभागांच्या समन्वयातून मिशन आणि सीएसआरच्या माध्यमातून या क्षेत्राला चालना देण्यात येईल. ड्रोनच्या चाचणीसाठी आवश्यक टेस्टिंग आणि रेंज सुविधा सक्षम करण्याबरोबर संरक्षण क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी एरोस्पेस क्षेत्र आणि संबंधित यंत्रणा तातडीने मजबूत करण्यात येणार असल्याचेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी