Mumbai Water Cut : मुंबईकरांवरील कपात कायम, पण जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पूर्वव्रत

- तलावांमधील पाणी अद्यापही ९० टक्क्यांच्या पुढे जाईना


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याची सप्टेंबर शेवटपर्यंत आढावा घेवूनही कपात मागे घेण्याचा विचार केला जाईल असे स्पष्ट करणाऱ्या प्रशासनाने अखेर मुंबईतील जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एका बाजुला नागरिकांवर दहा टक्के पाणी कपात असताना तरण तलावांचा पाणी साठा सुरु केल्याने नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी पसरली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. मुंबईकरांवर दहा टक्के पाणीकपात लागू असताना तसेच भविष्यामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवलेली असताना जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पूर्वव्रत करण्याची गरज काय असा सवाल शिंदे यांनी प्रशासनाला केला आहे. (Mumbai Water Cut)


पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून मुंबईकरांवर १० टक्के पाणी कपात लागू केल्यानंतर महापालिकेने कमर्शियल वापराच्या हॉटेल्स, कंपन्यांसह उद्योगधंद्यांकडे लक्ष केंद्रीत बुधवारी १७ जून २०२६ पासून आवश्यक मर्यादा सर्व जलतरण तलावांच्‍या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍याचे निर्देश देत त्याच अंमलबजावणी करण्यात येत होती. परंतु अवघ्या दोन महिन्यांतच नागरिकांवर लागू करण्यात आलेली कपात मागे न घेता जलतरण तलावांमधील पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. (Mumbai Water Cut)



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये बुधवारी १२ ऑगस्‍ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे १२,९५,२७४ दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लीटर पाण्याची गरज असते. त्यानुसार आता सुमारे ८९.४९ टक्के इतका आहे. मागील दहा दिवसांपासून यासर्व धरणांमध्ये ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला पाणी साठा मागे फिरत ९० टक्क्यांच्यात खेळता राहिलेला आहे. त्यामुळे पावसामुळे हा पाणी साठा वाढत नाही. (Mumbai Water Cut)


मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावांवरील सुविधा नागरिकांसाठी पुन्हा रविवार १६ ऑगस्ट २०२६ पासून सकाळ अथवा सायंकाळच्या सत्रात जलतरणाची सुविधा सुरू करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. यासाठी जलतरण तलावांची जलजोडणी पूर्ववत करण्याबरोबरच तलावातील पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे आणि जलतरण निर्देशक - नि - जीवरक्षकांची नेमणूक करण्‍याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित विभागीय सहायक अभियंत्यांशी संपर्क साधून जलतरण तलावांची जलजोडणी तातडीने पूर्ववत करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, जलतरण निर्देशक - नि जीवरक्षकांची सेवा व सुविधा उपलब्ध करून देऊन जलतरण तलावांचे दैनंदिन परिचालन आणि सुरक्षाव्यवस्था १०० टक्के क्षमतेने उपलब्ध करून देण्याबाबत अवगत करण्‍यात आले आहे. (Mumbai Water Cut)


जलतरण तलावांचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णयामुळे जलतरण तलावांचा वापर करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी, उपलब्ध जलसाठ्याचे दीर्घकालीन नियोजन लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता कायम आहे. आगामी काळातील पर्जन्यमान, जलसाठ्याची स्थिती आणि हवामानविषयक अंदाज यांचा सातत्याने आढावा घेऊन पाणीपुरवठ्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. (Mumbai Water Cut)



मुंबईचा पाणी साठा ९० टक्क्यांच्या आसपास आल्याने नागरिकांवर लागू करण्यात आलेली कपात मागे घेण्यात यावी अशी मागणी स्थायी समिती व सभागृहात केली जा आहे. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीतही याबाबत मागणी होत आहे. यावर स्वत: अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाणी साठ्याचा अंदाज घेवून कपातीचा निर्णय घेतला जाईल, परंतु सध्या कोणत्याही प्रकारे कपात मागे घेण्याचा विचार नसल्याचे गटनेत्यांच्या बैठकीपुढे सांगितले. परंतु गटनेत्यांच्या सभेत हे आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जलतरण तलावांचा पाणी साठा पूर्वव्रत करण्याचा निर्णय घेतल्याने याचा विरोध आता लोकप्रतिनिधींकडून होत आहे. खुद्द स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही याबाबती तीव्र नाराजी व्यक्त करत जर भविष्यात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे आणि लोकप्रतिनिधी कपात १० टक्के कपात मागे घेण्याची मागणी करत असताना जलतरण तलावांचा पाणीसाठा पूर्वव्रत केला जातो हा निर्णय चुकीचा असून याचे समर्थन किंवा स्वागत केले जावू शकत नाही. नागरिकांवरील कपात जर सप्टेंबर शेवटला पाणी साठ्याचा विचार करून मागे घेण्याचा निर्णय घेणार होता, तर ही एवढी घाई का असा सवाल शिंदे यांनी केला आहे. (Mumbai Water Cut)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.