प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. तपासणीदरम्यान मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास चालकाला ही एक महिन्याची सवलत दिली जाईल; मात्र या मुदतीत भाषा न शिकल्यास परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. (Taxi)



नव्या नियमांनुसार ही अट चालकांसाठीच नव्हे, तर वाहन परवानाधारकांसाठीही (परमिटधारक) लागू असेल. इलेक्ट्रॉनिक व विद्युत मीटर असलेल्या टॅक्सींच्या परवान्याचे नूतनीकरण करताना मालकाला मराठीचे ज्ञान असल्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे सिद्ध करावे लागेल. नियमांचे सतत उल्लंघन केल्यास चालकाला बाजू मांडण्याची संधी देऊन परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल. (Marathi Language)


दरम्यान, राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १४० हून अधिक केंद्रांवर हे वर्ग सुरू असून, सुमारे एक लाखांहून अधिक चालकांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये मुंबई आणि महानगर क्षेत्रातून सर्वाधिक प्रतिसाद लाभला आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी