Sukhbir Singh Badal Attack : धक्कादायक! नांदेडमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचारीही जखमी

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे  (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बादल हे कुटुंबीयांसह गुरुद्वारा माता साहिब कौर येथे दर्शनासाठी गेले असताना एका निहंगाने त्यांच्यावर कृपाणाने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारात एका वादातून हा प्रकार घडला. हल्लेखोर निहंगाच्या वेशात होता. त्याने बादल यांच्यावर कृपाणाने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. या झटापटीत सुरक्षा दलातील एक पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Attack)



घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास नांदेड पोलीस करत आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का किंवा एखाद्या वादातून अचानक घडला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Gurudwara)


माता साहिब कौर गुरुद्वारा नांदेड शहरातील मुख्य गुरुद्वारापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. बादल यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.


दरम्यान, सुखबीर सिंह बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. डिसेंबर 2024 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिराबाहेर सेवा बजावत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बादल यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. या प्रकरणातील हल्लेखोराची ओळख नारायण सिंह चौरा अशी झाली होती.


नांदेडमधील ताज्या घटनेनंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.  (Nanded)


Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी