Nashik : श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर १७ तास खुले

Nashik : श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी (Crowd management) प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देता सहज दर्शन मिळावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. श्रावणात देवस्थान पहाटे पाच ते रात्री नऊ म्हणजे १७ तास खुले राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.



श्रावण सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत दर्शन


भाविकांची पूर्व दरवाजा येथे गैरसोय होऊ नये, यासाठी वातानुकूलीत दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आहे. यामुळे हजारो भाविक या ठिकाणी उभे राहु शकतील. तसेच दर्शन रांगेत ज्येष्ठ मंडळीना बसण्यासाठी व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे शुध्द पाणी तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष असे सर्व नियोजन भाविकांसाठी करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात मंदिर दर्शनासाठी उघडण्याची वेळ पहाटे पाचपासून रात्री नऊपर्यंत राहणार आहे. हीच वेळ प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे चार ते रात्री नऊ अशी राहील.



रहिवासी असल्याचा पुरावा बंधनकारक


त्र्यंबकेश्वर शहरातील ग्रामस्थांना मंदिराच्या पश्चिम दरवाज्यातून प्रवेश मिळेल. त्यांच्यासाठी सकाळी सहा ते साडेदहा आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ अशी वेळ आहे. ग्रामस्थांनी दर्शनास येतांना स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बरोबर ठेवणे बंधनकारक आहे. धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजाने आणि देणगी दर्शन रांग उत्तर दरवाज्यापासून राहील. गर्भगृह दर्शन भाविकांसाठी बंद आहे. सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला