CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार



मुंबई : एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पाला सीडब्ल्यूसीची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. (CM Devendra Fadnavis)


महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्लूआरआरए) च्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्वेताली ठाकरे, प्राधिकरणाचे सदस्य, जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंता उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुटीची खोरी संतुलित करता येतील. या भागांना दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न हळूहळू पूर्णत्वाकडे जात असून काही प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे, तर काही प्रकल्प सविस्तर प्रकल्प अहवालाच्या टप्प्यावर आहेत, यासाठी काम करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. (CM Devendra Fadnavis)



राज्यात शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. अधिक पाणी उपलब्ध असलेल्या खोऱ्यांमधील पाणी तुटीच्या खोऱ्यांमध्ये नेण्यासाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाचे आहेत. वैनगंगा-नळगंगासह मान्यता मिळालेल्या विविध नदीजोड प्रकल्पांची कामेही सुरू करण्याचे नियोजन आहे. यातून दुष्काळी भागात देखील मुबलक पाणी उपलब्ध होईल. देशातील पहिले जलसंपत्ती नियमन प्राधिकरण महाराष्ट्रात स्थापन झाले. सर्वाधिक व्याप्ती असलेल्या गोदावरी खोऱ्याचा आराखडा सर्वप्रथम तयार करण्यात आला. त्यानंतर कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या आणि महानदी क्षेत्राचे आराखडे तयार करण्यात आले. हे सहा आराखडे एकत्र करून ऑक्टोबर २०१८ मध्ये महाराष्ट्राचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आला. असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. २०२४ मध्ये या एकात्मिक जल आराखड्यात आवश्यक बदल करून नदीजोड प्रकल्पांचाही समावेश करण्यात आला. वैनगंगा-नळगंगा हा विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असेही त्यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)



सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये



- यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या दरम्यान “जलप्रशुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उपाययोजना” याबाबत सामंजस्य कराराचे माझगाव डॉकचे संचालक कॅप्टन वासुदेव पुराणिक आणि एमडब्लूआरआरएच्या अध्यक्षा श्वेताली ठाकरे यांनी हस्ताक्षर केले.
- यावेळी जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, जल नियमन प्राधिकरण २००५ मध्ये स्थापन झाले पण प्रत्यक्षात २०१५ पासून त्याचे काम सुरू झाले आणि एकात्मिक जल आराखडा तयार करण्यासाठी पाऊल टाकले गेले. पहिला आराखडा गोदावरी नदीच्या खोऱ्याचा करण्यात आला. महाराष्ट्राच्या जवळपास ५० टक्के नद्या व उपनद्या या गोदावरी खोऱ्यामध्ये येत आहेत.
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, देशातील पहिला जल आराखडा महाराष्ट्राने तयार केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यास मूर्त स्वरूप देताना कार्यवाही सुरू केली. २०१८ मध्ये जल आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. याचा उद्देश शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचविणे हा आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी