Sunetra Pawar : बीडच्या क्रीडा संकुलाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ‘सरप्राईज व्हिजीट!’

आवश्यक सुविधा देऊन बीडच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा द्या - सुनेत्रा पवार


बीड : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन तेथील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. (Sunetra Pawar)


क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती आणि उपलब्ध सुविधांची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी युवकांचा सहभाग आणि नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. (Sunetra Pawar)



बीड जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा, सरावासाठी योग्य वातावरण आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच क्रीडा संकुलातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या.


यावेळी क्रीडा संकुलात उपस्थित असलेल्या मुलांशी त्यांनी आस्थेने संवाद साधला. कोणत्या खेळाचा सराव करता, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, प्रशिक्षण घेताना कोणत्या अडचणी येतात, याबाबत त्यांनी खेळाडूंकडून माहिती घेतली. बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळविणारे खेळाडू घडावेत, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. (Sunetra Pawar)


यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (Sunetra Pawar)

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली