Maharashtra Police : राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड

मुंबई : पोलीस, कारागृह आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या राष्ट्रपती पदकांसाठी महाराष्ट्रातील ५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. (Maharashtra Police)


केंद्रीय गृह मंत्रालयाने १४ ऑगस्ट रोजी देशभरातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर झालेली शौर्य, उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके घोषित केली. यामध्ये मानाच्या राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस श्रेणीतून महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक शिरीष रवींद्र जैन, उपपोलीस अधीक्षक सुभाष नानासाहेब भुजबळ आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय राजाराम वायचळे यांची निवड झाली आहे. तर कारागृह सेवा गटातून सुभेदार संजीव सखाराम घाणेकर आणि हवालदार संजय राजारामजी तळवारे यांना राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. (Maharashtra Police)



याशिवाय, गुणवत्तापूर्ण सेवा पदकांसाठी पोलीस सेवा श्रेणीत महाराष्ट्रातील ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपपोलीस महानिरीक्षक संजय बाजीराव जाधव, उपपोलीस महानिरीक्षक विजयकुमार गोपीनाथ मगर, पोलीस अधीक्षक दिगंबर पांडुरंग प्रधान, उपपोलीस अधीक्षक प्रशांत कुलकर्णी, भागीरथ देशमुख, प्रवीण तेजले, मनोजकुमार यादव, तसेच पोलीस निरीक्षक वैभवकुमार जाधव, संतोष बारगे, विश्वजीत कागिंडे, जितेंद्र कदम, विनोद पाटील, प्रदीप चौगावकर यांच्यासह इतर साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. (Maharashtra Police)


इतर दलांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचाही या यादीत समावेश आहे. अग्निशमन सेवेतून मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर उत्तम मिसाळ आणि अग्निशामक शैलेश महादेव जगताप यांची निवड झाली आहे. गृहरक्षक व नागरी संरक्षण क्षेत्रातील योगदानासाठी पोपट रामजी सांगडे, अशोक नामदेव इंगळे व मनोज सदाशिव बारसागडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच कारागृह सेवेतून अधीक्षक विकास हनुमंत राजनाळवार आणि हवालदार महेश लक्ष्मण गडनाईक यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. (Maharashtra Police)

Comments
Add Comment

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ