Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वडूज येथे भव्य तिरंगा रॅली

वडूज, ता. खटाव : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी, खटाव तालुक्याच्या वतीने हुतात्म्यांची नगरी वडूज येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. (Har Ghar Tiranga)


वडूज येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.


या भव्य रॅलीमध्ये सोनिया जयकुमार गोरे, खटाव तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने संपूर्ण वडूज शहर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारावून गेले. (Har Ghar Tiranga)



सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांच्या शौर्याने आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यसंग्रामाच्या यज्ञात या भूमीतील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी हसत-हसत आपल्या प्राणांची आहुती दिली. १९४२च्या ‘छोडो भारत’ अर्थात ‘करो या मरो’ आंदोलनाला प्रतिसाद देत ९ सप्टेंबर १९४२ रोजी हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली वडूज येथील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ९ स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. (Har Ghar Tiranga)


अशा शूर हुतात्म्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची प्रेरणा लाभलेल्या वडूज नगरीत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या तिरंगा रॅलीने राष्ट्रभक्तीचा जागर घडवून आणला. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशप्रेमाची भावना आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची स्मृती यांचा भावपूर्ण संगम या रॅलीतून अनुभवायला मिळाला. (Har Ghar Tiranga)


हुतात्म्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेत राष्ट्राची एकता, अखंडता आणि तिरंग्याचा सन्मान जपण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.


हुतात्म्यांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन!
भारत माता की जय!

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी