Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. सिंधू पाणी कराराबाबत बोलताना त्यांनी भारताला थेट धमकी दिली असून, "पाकिस्तानच्या पाण्याचा प्रत्येक थेंब ही आमची 'रेड लाईन' आहे," असा इशारा दिला आहे. भारताने आपली भूमिका बदलली नाही, तर पाकिस्तान त्याला थेट उत्तर देईल, असेही शरीफ म्हणाले. ( Shehbaz Sharif News)

सभेत बोलताना शहबाज शरीफ म्हणाले, "पाकिस्तान शांतता आणि आदराच्या बाजूने उभा आहे, मात्र याला आमचा कमकुवतपणा समजू नये. भविष्यात जर कोणी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला किंवा सुरक्षेला आव्हान दिले, तर मे २०२५ मधील संघर्षापेक्षाही अधिक ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल." विशेष म्हणजे, एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित ठेवला होता. त्यानंतर मे २०२५ मध्ये भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर स्ट्राइक केला होता. या कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत असून, मे २०२५ मधील तणावानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी गयावया करण्यास सुरुवात केली होती.

सीझफायरचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना!

आपल्या भाषणात शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान योग्य वेळी हस्तक्षेप करून सीझफायर घडवून आणण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली, ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले, असा दावा शरीफ यांनी केला. तथापि, भारत सरकारने सीझफायर किंवा द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थतेचा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे.

चीन, सौदी आणि तुर्कीचा जप!

शहबाज शरीफ यांनी चीनचे कौतुक करताना म्हटले की, "चीन हा आमचा असा मित्र आहे जो प्रत्येक कठीण प्रसंगात हिमालयासारखा पाठीशी उभा राहिला." याशिवाय, सौदी अरेबियासोबत झालेला संरक्षण करार आणि त्यात तुर्कीचा झालेला समावेश यांचा उल्लेख करत त्यांनी हा मुस्लिम विश्वासाठी शांततेचा संदेश असल्याचे म्हटले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. सिंधू पाणी कराराबाबत बोलताना त्यांनी भारताला थेट धमकी दिली असून, "पाकिस्तानच्या पाण्याचा प्रत्येक थेंब ही आमची 'रेड लाईन' आहे," असा इशारा दिला आहे. भारताने आपली भूमिका बदलली नाही, तर पाकिस्तान त्याला थेट उत्तर देईल, असेही शरीफ म्हणाले.

सभेत बोलताना शहबाज शरीफ म्हणाले, "पाकिस्तान शांतता आणि आदराच्या बाजूने उभा आहे, मात्र याला आमचा कमकुवतपणा समजू नये. भविष्यात जर कोणी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला किंवा सुरक्षेला आव्हान दिले, तर मे २०२५ मधील संघर्षापेक्षाही अधिक ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल." विशेष म्हणजे, एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित ठेवला होता. त्यानंतर मे २०२५ मध्ये भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर स्ट्राइक केला होता. या कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत असून, मे २०२५ मधील तणावानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी गयावया करण्यास सुरुवात केली होती.

सीझफायरचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना!

आपल्या भाषणात शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान योग्य वेळी हस्तक्षेप करून सीझफायर घडवून आणण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली, ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले, असा दावा शरीफ यांनी केला. तथापि, भारत सरकारने सीझफायर किंवा द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थतेचा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे.

चीन, सौदी आणि तुर्कीचा जप!

शहबाज शरीफ यांनी चीनचे कौतुक करताना म्हटले की, "चीन हा आमचा असा मित्र आहे जो प्रत्येक कठीण प्रसंगात हिमालयासारखा पाठीशी उभा राहिला." याशिवाय, सौदी अरेबियासोबत झालेला संरक्षण करार आणि त्यात तुर्कीचा झालेला समावेश यांचा उल्लेख करत त्यांनी हा मुस्लिम विश्वासाठी शांततेचा संदेश असल्याचे म्हटले.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे