Kalyan Power Cut : कल्याण ते बदलापूर वीजपुरवठा बंद; ‘या’ भागांत सकाळी ६ ते ११ पर्यंत शटडाऊन

कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरासह टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेच्या कामासाठी काही भागांत नियोजित वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रकल्पासाठी महापारेषणची पडघा-मोहने १०० केव्ही वीजवाहिनी बंद ठेवण्यात येणार असल्याने हा वीजपुरवठा खंडित होणार आहे. महावितरणच्या कल्याण मंडळातील माहितीनुसार, सकाळी ६ ते ११ या कालावधीत कल्याण मंडळ क्रमांक १ आणि २ अंतर्गत विविध भागांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील तसेच व्यावसायिक कामांचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कुठे आणि किती वेळ वीज बंद?


टिटवाळा, मांडा, बल्याणी आणि अंबिवली रोड परिसरात सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे. तर खडकपाडा, बारावे, चिकणघर, रामबाग, कर्णिक रोड, पौर्णिमा चौक, रेल्वे हॉस्पिटल आणि रुक्मिणीबाई रुग्णालय परिसरात सुमारे पाच तासांचा वीजपुरवठा खंडित राहणार आहे. याशिवाय योगीधाम, गौरीपाडा, शहाड, बिरला कॉलेज, इंदिरानगर, म्हाडा कॉलनी, कोकण वसाहत आणि संदीप हॉटेल परिसरावरही या नियोजित वीजखंडितचा परिणाम होणार आहे.



पाणीपुरवठ्यावरही परिणामाची शक्यता


वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे KDMCच्या बारावे आणि अटाळी पाणीपुरवठा पंपांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक प्रभावित होऊ शकते. अटाळी, वडवली, अंबिवली आणि नेपच्युन परिसरातील नागरिकांनीही याची नोंद घ्यावी. दरम्यान, कात्रप, खरवाई, जुवेली, बदलापूर, बापसई, गोवेली, अंबरनाथ रेल्वे स्टेशन, कानसई आणि मोरीवली MIDC परिसरातही टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. नियोजित देखभाल आणि महामार्गाच्या कामासाठी हा वीजखंडित करण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वीज परत सुरू होण्याची वेळ संबंधित भागातील काम पूर्ण झाल्यानुसार बदलू शकते.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.