Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत. सुनीता आहुजा गेल्या काही महिन्यांपासून गोविंदावर विविध आरोप करत आहे. याच सततच्या आरोपांना वैतागून गोविदांने सुनीताला लिमिटमध्ये राहा अशी वॉर्निंग दिली आहे. (Govinda and Sunita Ahuja Controversy)


गोविंदा नुकताच कोमल राणी सुवर्णकार या अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. त्यानंतर कोमल ही गोविंदाची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ज्यावर सुनीतानं "आपल्या लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय. जरा लाज वाटू द्या" असं म्हणत प्रतिक्रिया दिली होती. त्याचबरोबर गोविंदाला ती शुगर डॅडी देखील म्हणाली होती. (Govinda and Sunita Ahuja Controversy)


या सर्व प्रकारावर वैतागून गोविंदानं व्हिडीओ शेअर करत सुनीताला खडेबोल सुनावले. गोविंदानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, "मी पुन्हा सांगेन... सुनिताजी, तुम्ही खूप जास्त आई-बहिणीच्या शिव्या द्यायला लागला आहात. तरुण पिढी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते, तुम्ही जसे वागाल तसेच ते अनुकरण करतील. जर उद्या लोकांनी तुमच्यावरच आई-बहिणीच्या शिव्या द्यायला सुरुवात केली तर ते खूप लाजीरवाणे ठरेल. तुमच्याकडून अशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा नाहीये." (Govinda and Sunita Ahuja Controversy)



मी जे काम करतोय, त्यात तुम्ही हस्तक्षेप करत आहात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं काम करत होतात, मग ते खाण्याचं काम असो किंवा लॉकअप, टीनाच्या मार्फत दोन्ही गोष्टींमध्ये मला वेगवेगळ्या मार्गानं बोलावून घेण्यात आलं व तुम्हाला जसं हवं तसं काम माझ्याकडून करून घेण्यात आलं. असो, तो तर तुमचा हक्कच आहे." गोविंदा पुढे असंही म्हणाला की, "ज्यावेळी मी चित्रपट सुरू करतो, त्यावेळी मी बदनाम व्हावं किंवा माझं व्यवसायिक नुकसान व्हावं यासाठी तुम्ही कोणतीही कसर सोडत नाही. एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्ती ज्यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्याला अशा प्रकारे दुखावू नका की तो घाबरून जाईल. आत्मसन्मान ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे."


गोविंदानं सुनिताला वॉर्निंग देत म्हटलं आहे, "मी तरुण कसा दिसू शकतो हे तुम्हाला पाहायचं नाहीये. तुम्ही तुमच्या छोट्याशा अपेक्षेपोटी एका मोठ्या व्यवसायाला हानी पोहोचवण्यात बिझी आहात. तुमच्या मागे जो गट किंवा गँग आहे त्याबद्दल सर्वांना माहित आहे. मला वाटतं की ती माहिती लवकरच सर्वांसमोर उघड होईल. हे तुमच्यासाठीही शोभण्यासारखं नाहीये मला वाटतं की पुढेही तुम्हाला माझी कुठेतरी गरज पडेलच. त्यामुळे कृपया अशी स्टेटमेंट देणे, हे पॉडकास्ट चालवणं या सर्व गोष्टी करणे थांबवा. थोडं आपल्या लिमिट राहा अशीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद." (Govinda and Sunita Ahuja Controversy)

Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ