NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात मोठे फेरबदल होणार

- सुप्रिया सुळे यांचे संकेत; सलग दोन दिवस बैठकांचे सत्र


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात राज्य पातळीवर लवकरच मोठे फेरबदल होणार असून, येत्या दोन दिवसांत पक्षाच्या नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शनिवारी दिली. पक्षातील राज्य पातळीवरील प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यानंतर उठलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, नव्या नियुक्त्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन दिवस बैठकांचे सत्र पार पडत आहे. (NCP Sharad Pawar)



सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, सध्या पक्षात राज्य पातळीवर दोनच प्रवक्ते कार्यरत आहेत, तर राष्ट्रीय प्रवक्ते अद्याप कायम आहेत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत राज्यातील प्रवक्त्यांची नवीन यादी निश्चित केली जाईल आणि पुढील दोन दिवसांत ती प्रसिद्ध केली जाईल. या फेरबदलांमधून पक्षाच्या संवाद यंत्रणेला नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (NCP Sharad Pawar)



महिला आरक्षण विधेयकावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्ष एकाच मताचे आहेत. २०२३ मध्ये हे विधेयक सर्वपक्षीय संमतीने मंजूर झाले असून, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी हीच सर्व पक्षांची इच्छा आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेचे सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. खासगी कोचिंग क्लासेसवर कोणतेही नियंत्रण नव्हते आणि त्यांच्याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे या क्षेत्रावर नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक होते. या निर्णयामुळे सकारात्मक बदल घडतील आणि भविष्यात स्पर्धा परीक्षांचे किंवा 'नीट'चे पेपर फुटणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (NCP Sharad Pawar)

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'