Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake) झाला. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली असून अनेक ठिकाणी इमारतींचे नुकसान झाले आहे. सुरुवातीला दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती; मात्र त्यानंतरच्या अहवालांनुसार मृतांचा आकडा वाढून किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Indonesia Earthquake)



त्सुनामीचा इशारा, नागरिकांचे स्थलांतर :


समुद्रात झालेल्या या शक्तिशाली भूकंपानंतर इंडोनेशियाच्या हवामान आणि भूभौतिकी संस्थेने काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला. किनारी भागातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी उंच ठिकाणी धाव घेतली. काही भागात एक मीटरपेक्षा कमी उंचीच्या त्सुनामी लाटा नोंदवण्यात आल्या. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही तासांनी त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला. (Indonesia Earthquake)



भूकंपानंतर अनेक आफ्टरशॉक्स :


मुख्य भूकंपानंतर अनेक आफ्टरशॉक्स जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासन आणि बचाव पथके नुकसानग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य करत आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठा आणि दळणवळण व्यवस्थेलाही फटका बसल्याचे वृत्त आहे. (Indonesia Earthquake)



‘रिंग ऑफ फायर’मुळे इंडोनेशिया भूकंपप्रवण :


इंडोनेशिया हा प्रशांत महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात येतो. या परिसरात अनेक टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचाली होत असल्याने येथे भूकंप आणि ज्वालामुखीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आफ्टरशॉक्सच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Indonesia Earthquake)

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे