Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला अभिनेता अश्विन मुश्रान याच्या कारचा अपघात झाला. गोव्यातील मडगाव जिल्ह्यातील केपेम येथील कुसमानमध्ये रस्त्याच्या चुकीच्या बाजूने कार चालवताना दुचाकीवरून जात असलेल्या वडील-मुलाच्या जोडीला धडक दिल्याचा आरोप अभिनेत्यावर होत आहे. अपघातात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर अभिनेता अश्विन मुश्रान आणि त्याची पत्नी स्थानिकांशी वाद घालत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.



दुचाकीस्वाराच्या चुकीमुळेच अपघात झाला, असे अभिनेता अश्विन मुश्रानचे म्हणणे आहे तर स्थानिकांनी अभिनेत्यावरच चूक केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्याच्या चुकीमुळे दुचाकीस्वार जखमी झाला. दुचाकीस्वाराच्या हाडाचा एक तुकडा अभिनेत्याच्या कारच्या उजव्या टायरच्या फेंडरमध्ये अडकला आहे. त्यामुळे अभिनेत्यानेच भरपाई द्यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. याच मुद्यावरून अभिनेता अश्विन मुश्रान आणि त्याची पत्नी स्थानिकांशी जोरदार वाद घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वादादरम्यान मुश्रानची पत्नी थुंकली, असाही आरोप स्थानिकांनी केला आहे. यानंतर प्रकरण चिघळले. त्यावेळी परिस्थिती शांत करण्याऐवजी अश्विन मुश्रान आणि त्याची पत्नी कारमधून लगेच निघून गेले. पण थोड्या वेळाने अश्विन परत आला आणि त्याने स्थानिकांची माफी मागितली. पण माफी मागताना मुश्रानची वृत्ती बेफिकीर आणि प्रामाणिकपणाचा अभाव असलेली वाटली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अपघात प्रकरणी अद्याप पोलिसांनी तसेच अभिनेता अश्विन मुश्रानने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही.

Comments
Add Comment

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं