Nitesh Rane : आजपासून मुंब्रा नव्हे 'मुंब्रादेवी'च म्हणा!

- मंत्री नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन; कोणाच्याही दहशतीला भीक घालू नका


मुंबई : "मुंब्रा हे शहर कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे किंवा कोणाच्या 'अब्बाचे' पाकिस्तान नाही. मुंब्रादेवी आणि महादेवाच्या भक्तीने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. त्यामुळे आजपासून प्रत्येकाने या शहराचा उल्लेख 'मुंब्रा' असा न करता 'मुंब्रादेवी' असाच करावा," असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रविवारी केले.


विश्व हिंदू परिषद अंतर्गत श्री मुंब्रेश्वर महादेव कावडिया मंडळाच्या वतीने मुंब्रा शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत सहभागी होऊन मंत्री नितेश राणे यांनी हिंदू जनसमुदायाशी संवाद साधला. राणे म्हणाले, "माझ्या मुंब्र्यात येण्याच्या बातमीने अनेकांच्या पोटात दुखत होते. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंब्र्यात येऊ नये, असे काहींना वाटत होते. परंतु, हे शहर हिंदू राष्ट्रात आणि हिंदू महाराष्ट्रात येते. त्यामुळे आपल्याच देशात हिंदू बांधवांना भेटायला आणि त्यांना ताकद द्यायला येण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही."



मुंब्रा ही महादेवाची भूमी आहे. त्यामुळे कोणीही भीतीपोटी किंवा कोणाच्या 'खौफ'मुळे हेmum शहर सोडून पलायन करण्याचा विचारही मनात आणू नये. मुंब्रादेवीमध्ये हिंदूंची लोकसंख्या वाढली पाहिजे आणि अधिकाधिक हिंदूंनी येथे हक्काने राहिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण ताकदीने हिंदू समाजाच्या पाठीशी उभे आहे, असे आवाहन त्यांनी (Nitesh Rane) केले.


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या भूमीत मुंब्रादेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असत. हा आपल्या स्वराज्य आणि संस्कृतीचा गौरवशाली इतिहास आहे. त्यामुळे मुंब्रादेवी हे ठिकाण कालही भगवे होते, आजही भगवे आहे आणि उद्याही भगवेच राहील, असेही नितेश राणे म्हणाले.



हिंदूंना धमकी आल्यास मी एका तासात हजर होणार' :


मंत्री राणे म्हणाले, "तुम्ही सर्वांनी मतदानाच्या माध्यमातून राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आणले आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आज मंत्रालयात बसलो आहोत. त्यामुळे हिंदू बांधवांचे रक्षण करणे आणि हिंदू भगिनींना सुरक्षितता पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. कोणीही तुमच्याकडे वाईट नजरेने पाहू शकणार नाही, एवढी मोठी ताकद तुमच्यामागे उभी आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी धमकावण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुमचा हा भाऊ नितेश राणे एका तासात तुमच्या रक्षणासाठी मुंब्रादेवीमध्ये येऊन उभा राहील", अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच कावड यात्रेप्रमाणे हिंदू समाजाने आपले सर्व सण आणि उत्सव अत्यंत जोशात, जल्लोषात आणि निर्भयपणे साजरे केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. (Nitesh Rane)




Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण