Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणाला अखेर नव्याने तपासाची दिशा मिळाली आहे. (Suman Kale Murder Case)


विवेक विचार मंचाचे राज्य सहयोजक प्रा. सागर शिंदे यांनी या प्रकरणाबाबत अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली. आयोगाचे तत्कालिन उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रत्यक्ष अहिल्यानगर येथे दिनांक २३ मार्च २०२५ ला प्रत्यक्ष भेट देऊन, प्रकरण समजून घेत सीआयडी अधिकारी प्रशासकीय बैठक घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. (Suman Kale Murder Case)



या प्रकरणाला विधानसभेतही आवाज मिळाला. श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सुमन काळे मृत्यू प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत करण्याची मागणी केली. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत शासनाची भूमिका स्पष्ट करत या प्रकरणाच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. (Suman Kale Murder Case)


त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची संवेदनशीलतेने दखल घेत विशेष तपास पथक गठित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दि. १३ ऑगष्ट २०२६ ला विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करत ३ महिन्यात पोलिस यंत्रणेला तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Suman Kale Murder Case)



वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमन काळे यांच्या कुटुंबासाठी ही कार्यवाही महत्त्वाची ठरली असून, स्वतंत्र व निष्पक्ष तपासातून सत्य समोर येऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Suman Kale Murder Case)

Comments
Add Comment

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Food And Drug Administration : FDA ची राज्यभरात मोठी कारवाई; 7 महिन्यांत 152.65 कोटींचा अन्नसाठा जप्त, 1,688 जणांना अटक

मुंबई : राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे. ज्या गावांमध्ये

IAS officers Transfers : राज्यातील चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य शासनाने शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले.

Revenue Department : दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आता आयकर विभागाला जाणार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिल्यास