Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार


मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात आलेल्या व्यावहारिक मराठी भाषेच्या परीक्षेत तब्बल ७ हजार ७५० चालक नापास झाले आहेत. पुरेशी मुदत देऊनही मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुजोर चालकांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून, त्यांना ३० दिवसांची अंतिम नोटीस दिली जाईल. या कालावधीतही सुधारणा न झाल्यास आधी परवाना (लायसन्स) निलंबित करून पुढे परमिट रद्द केले जाईल, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.



महाराष्ट्रात १९८९ च्या मोटार वाहन नियमांनुसार परमिटधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक आहे. प्रवाशांशी संवाद साधताना भाषेवरून होणारे वाद टाळण्यासाठी परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. यासाठी चालक संघटनांच्या विनंतीवरून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने विशेष मार्गदर्शन वर्गही चालवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ऑटो व टॅक्सी चालकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४० हजार चालक उत्तीर्ण झाले असून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. मात्र, अंतिम मुदत संपल्यानंतरही ७ हजार ७५० चालक मराठीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.


याविषयी बोलताना परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, ज्या चालकांना खरोखर शिकायचे आहे, त्यांना सरकार काही प्रमाणात वेळ वाढवून देण्याचा सकारात्मक विचार करेल. परंतु, मुद्दाम मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई होईल. पहिल्या टप्प्यात ३० दिवसांची नोटीस दिली जाईल; त्यातही मराठी आत्मसात न केल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल आणि तरीही सुधारणा न झाल्यास परमिटच रद्द केले जाईल. दरम्यान, अनेक चालक प्रवाशांशी मराठीत बोलण्यास तयार असतात परंतु प्रवासीच हिंदीत संवाद साधतात, असे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी प्रवाशांनाही रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी मराठीतूनच संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी