Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. पण काही काळानंतर प्रश्न सुटेल या आशेवर राहून नागरिक तक्रार करणे टाळत आहेत. या अशा वातावरणात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मेट्रोचे काम करताना केल्या जाणाऱ्या खबरदारीच्या उपायांविषयी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ताजी घटना मिरा रोड येथील गोल्डन नेस्ट परिसरातील आहे. या भागात मेट्रोचे काम सुरू असताना दुर्घटना झाली.







मिरा रोड येथील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना स्लॅब कोसळला. खाली रस्त्यावरून वाहतूक वेगाने सुरू असताना ही दुर्घटना घडली. जमिनीवर पडलेल्या स्लॅबचा मोठा आवाज ऐकल्यामुळे अनेकजण घाबरले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन स्लॅबचे तुकडे रस्त्याच्या कडेला ढकलण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्लॅबचे तुकडे एका बाजूला केल्यानंतर पोलीस बंदोबस्तात टप्प्याटप्प्याने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.




स्कूल व्हॅनचं काय झालं ?


रस्त्यावरून स्कूल व्हॅन जात असताना स्लॅबचे तुकडे रस्त्यावर पडून विखुरले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्कूलव्हॅन चालकाला वाहन सावरण्याची पुरेशी संधीच मिळाली नाही. स्लॅबच्या एका छोट्या तुकड्यावरून स्कूलव्हॅन वेगाने पुढे गेली. यामुळे स्कूलव्हॅनचे टायर पंक्चर झाले. MMRDA प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारा विरोधात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली आहे. प्रकल्पाचे कंत्राटदार आणि त्यांचे सहाय्यक असलेले अभियांत्रिकी कंत्राटदार या दोन्ही कंपन्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. MMRDA ने दिलेल्या माहितीनुसार प्रकल्पाचे कंत्राटदार, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि. (जेकेआयएल), यांच्यावर १० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर आर्किटेक्चरल फिनिशिंग कंत्राटदार, एन. ए. गजानन, यांना १.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रकल्पाचे जनरल कन्सल्टंट, सिस्ट्रा-सीईजी, यांनाही १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे