Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या शानदार कारकिर्दीला पूर्णविराम देण्याच्या तयारीत आहे. रोनाल्डोने २०२६-२७ हा हंगाम आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीतील अखेरचा हंगाम ठरू शकतो, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. ४१ वर्षीय रोनाल्डो सध्या सौदी अरेबियातील अल-नस्र क्लबकडून खेळत असून त्याचा करार जून २०२७ पर्यंत आहे. Vogue ला दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने म्हटले, “हा कदाचित माझ्या फुटबॉल कारकिर्दीतील शेवटचा वर्ष असेल आणि मला एक शानदार वारसा मागे ठेवायचा आहे.”



फुटबॉलनंतरच्या आयुष्याचेही नियोजन :


रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजनही सुरू केले आहे. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणे, प्रवास करणे, पॅडेल खेळणे आणि सामने पाहणे यासाठी वेळ देणार असल्याचे त्याने सांगितले. “फुटबॉल सोडल्यानंतर आयुष्यात मोठी पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे तो वेळ अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी भरावा लागेल. मला अधिक प्रवास करायचा आहे, पॅडेल खेळायचे आणि पाहायचे आहे,” असे रोनाल्डो म्हणाला.



२०२६ विश्वचषक ठरला अखेरचा :


२०२६ फिफा विश्वचषक हा आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील अखेरचा टप्पा असेल, असे रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) यापूर्वीच स्पष्ट केले होते. पोर्तुगालला स्पेनविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत रोनाल्डोने तीन गोल केले. त्यासह तो सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याच्या विश्वचषक कारकिर्दीत २७ सामन्यांत ११ गोल आहेत.



१००० गोलांच्या विक्रमाचे लक्ष्य :


रोनाल्डोसमोर (Cristiano Ronaldo) आणखी एक मोठे लक्ष्य आहे. त्याच्या वरिष्ठ कारकिर्दीत १,००० गोलांचा टप्पा गाठण्यासाठी तो सध्या २४ गोलांनी दूर आहे. हा ऐतिहासिक विक्रम आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस गाठण्याची त्याची इच्छा आहे. पोर्तुगालचा नवा प्रशिक्षक जॉर्ज जिझस यांनीही रोनाल्डोला “पोर्तुगीज फुटबॉलचे प्रतीक” म्हटले असून, तो तंदुरुस्त आणि खेळत असेपर्यंत त्याची निवड सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.



अशी आहे रोनाल्डोची ऐतिहासिक कारकीर्द :


स्पोर्टिंग सीपीपासून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद, युव्हेंटस आणि अल-नस्र या क्लबचे प्रतिनिधित्व केले. रिअल माद्रिदकडून त्याने ४३८ सामन्यांत तब्बल ४५० गोल केले असून तो क्लबचा सर्वकालीन सर्वोच्च गोल करणारा खेळाडू आहे. रोनाल्डोने आतापर्यंत पाच बॅलन डी'ऑर पुरस्कार आणि पाच चॅम्पियन्स लीग विजेतेपदं जिंकली आहेत. इंग्लंड, स्पेन आणि इटलीमध्ये त्याने लीग विजेतेपद पटकावले. पोर्तुगालसोबत त्याने युरोपियन चॅम्पियनशिप आणि नेशन्स लीगही जिंकली आहे.


आता २०२६ विश्वचषकानंतर रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या संपूर्ण फुटबॉल कारकिर्दीच्या समाप्तीचेही संकेत दिल्याने, २०२६-२७ हंगाम हा या महान फुटबॉलपटूचा अखेरचा अध्याय ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून