Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) माहितीनुसार, एन्दे शहराच्या उत्तर-पश्चिम दिशेला 5.7 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 35 किलोमीटर खोलीवर होता. या धक्क्यानंतर तातडीने कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. (Indonesia Earthquake)


यापूर्वी शनिवारी इंडोनेशियाच्या पूर्व भागात 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भूस्खलन आणि घरांचे नुकसान झाले. रविवारी बचाव पथकांनी आणखी 6 मृतदेह बाहेर काढल्यानंतर या भूकंपातील मृतांचा आकडा 53 वर पोहोचला आहे. आणखी भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याने हजारो नागरिकांनी रात्र घराबाहेर किंवा तात्पुरत्या ठिकाणी घालवली. (Indonesia News)



फ्लोरेस बेटावरील अनेक भागांत बचावकार्य सुरू आहे. भूकंपामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी पथके काम करत आहेत. मंग्गराई, पूर्व मंग्गराई आणि नागेकेओ या भागांमध्ये शोधमोहीम अधिक वेगाने सुरू आहे. यापैकी मंग्गराई भागाला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. (Earthquake)


भूस्खलनामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता. बचाव पथकांनी अनेक रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतूक पूर्ववत केली आहे. मात्र दळणवळणाच्या समस्या आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मदत आणि बचावकार्याला अडचणी येत आहेत. (Internation News)


पूर्व नुसा तेंगारा प्रांतात 900 हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून सुमारे 450 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जवळपास 5,000 नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये राहावे लागत आहे. फ्लोरेस भागातही किमान 241 घरांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.


शनिवारी झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र काही वेळाने हा इशारा मागे घेण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा 5.7 तीव्रतेचा धक्का बसल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. (Natural Disater)


Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका