Navnath Ban : ‘मातोश्री पॅटर्न’ महाराष्ट्राला सांगा, मग ‘जामनेर पॅटर्न’च्या गप्पा करा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात

मुंबई : नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आणि भाजप यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप चांगलेच तीव्र झाले आहेत. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी राऊतांवर जोरदार टीका करत, “टेंडरमधील टक्केवारीचा मातोश्री पॅटर्न काय होता, हे आधी महाराष्ट्राला सांगा आणि मग जामनेर पॅटर्नच्या गप्पा करा,” असे सुनावले.


नवनाथ बन (Navnath Ban) यांनी टेंडरमध्ये कमिशनखोरीचे आरोप करत राऊत आणि ठाकरे गटावर निशाणा साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “टेंडरमध्ये २५ टक्के कमिशन घेण्याचा मातोश्री पॅटर्न महाराष्ट्राला माहिती आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच मुंबई महापालिकेच्या कारभारावरूनही त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले.



‘नाशिकच्या खड्ड्यांचे काम युद्धपातळीवर’ :


नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना बन (Navnath Ban) म्हणाले की, नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासन सक्षमपणे काम करत असून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिकची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन यांनी घेतल्याचा दावाही त्यांनी केला. “नाशिकमध्ये जाऊन नाटकीपणा करण्यापेक्षा आपल्या उबाठा गटात पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करा. अख्खा पक्ष खड्ड्यात गेला आहे, तो वाचवा आणि मग इतरांवर टीका करा,” अशा शब्दांत बन यांनी राऊतांना लक्ष्य केले.



‘तुमची सोन्याची लंका उध्वस्त होईल’ :


संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन (Navnath Ban) यांनी रावणाचा दाखला देत ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावरून त्यांनी ठाकरे गटावर आरोप केले. “तुम्ही अहंकारी रावण आहात आणि महाराष्ट्र लुटून अडीच वर्षे, तसेच २५ वर्षे मुंबई महापालिकेत लूट करून सोन्याची लंका उभी केली आहे. तुमची सोन्याची लंका आणि अहंकार उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही,” असे बन म्हणाले.



राऊतांवर ‘कमिशनखोरी’चा आरोप :


सत्ता गेल्यामुळे आणि कथित कमिशनखोरी बंद झाल्यामुळे राऊतांचा जळफळाट होत असल्याचा आरोपही बन यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा कारभार सक्षमपणे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. नाशिकमध्ये आंदोलन किंवा मोर्चा काढण्यापेक्षा ठाकरे गटातील अंतर्गत परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी (Navnath Ban) लगावला.



कुंभमेळ्यावरूनही राऊतांना लक्ष्य :


नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरूनही नवनाथ बन (Navnath Ban) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. लाखो हिंदू आणि साधुसंत नाशिकमध्ये एकत्र येणार असल्यामुळे राऊतांना या सोहळ्याबद्दल विरोध असल्याचा आरोप त्यांनी केला. “हिंदू एकत्र आले की संजय राऊत यांचे पोट दुखते,” असा आरोप करत बन यांनी कुंभमेळा भव्य आणि यशस्वी होईल, असा दावा केला.


दरम्यान, नाशिकमधील खड्डे, कुंभमेळ्याची तयारी आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि ठाकरे गटातील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Navnath Ban)

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण