OBC Sarpanch : ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे 'ओबीसी' सरपंचांची संख्या कमी होणार

- सुधारित आदेश जारी; १५ जिल्ह्यांतील ५१२ आरक्षित पदे आता खुल्या प्रवर्गात


मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर, ग्रामविकास विभागाने इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) सरपंचपदांबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. ५० टक्क्यांच्या कायदेशीर मर्यादेचे काटेकोर पालन करण्यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत ५१२ ने कमी करण्यात आली आहे. या कपातीमुळे ही ५१२ पदे आता खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत. (OBC Sarpanch)



राज्य निवडणूक आयोगाने १३ जून २०२५ रोजी जाहीर केलेल्या मूळ अधिसूचनेनुसार, १५ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकूण ६ हजार ७१९ सरपंचपदे आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र, एकूण आरक्षणाचा टक्का ५० च्या वर जात असल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला होता. हा पेच सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागाने सुधारित आदेश जारी करत ओबीसी प्रवर्गासाठीची सरपंचपदे ६ हजार २०७ इतकी निश्चित केली आहेत. (OBC Sarpanch)



ओबीसी आरक्षणातील (OBC reservation) ५१२ पदे कमी झाल्यामुळे त्याचा फायदा खुल्या प्रवर्गाला मिळाला आहे. पूर्वीच्या अधिसूचनेत खुल्‍या प्रवर्गासाठी १३ हजार ७७ पदे निश्चित करण्यात आली होती. ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या अंमलबजावणीनंतर आता खुल्‍या प्रवर्गातील पदांची संख्या ५१२ ने वाढून ती १३ हजार ५८९ वर पोहोचली आहे. १५ जिल्ह्यांमध्ये हे सुधारित समीकरण लागू करण्यात आले आहे. (OBC Sarpanch)

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.