Palghar Blast Tarapur : तारापूर MIDC मध्ये भयंकर दुर्घटना! 'विराज प्रोफाइल'मध्ये एकापाठोपाठ ३ भीषण स्फोट; ३ कामगार जखमी

पालघर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्रात आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ तीन महाभयंकर स्फोटांनी थरकाप उडाला. बोईसर परिसरातील 'विराज प्रोफाइल' या नामांकित कंपनीत सकाळी पहिल्या शिफ्टचे काम सुरू असतानाच हा भीषण अपघात घडला. स्फोटाचा हादरा इतका शक्तिशाली होता की, कारखान्याच्या इमारतीचे लोखंडी पत्रे उडून दूर फेकले गेले, तर सुरक्षारक्षकांच्या केबिनसह आसपासच्या परिसरातील काचांचा चुराडा झाला.



भंगार वितळवणाऱ्या फर्नेस टँकमध्ये स्फोट




मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर एमआयडीसीतील 'एसएमएस वन' (SMS-1) प्लांटमध्ये विराज प्रोफाइल कंपनीचा कारखाना आहे. या ठिकाणी भंगार (Scrap) वितळवून त्यापासून स्टील बनवण्याचे काम केले जाते. सोमवारी सकाळी कामगार कामावर हजर झाले आणि नेहमीप्रमाणे उत्पादन सुरू झाले. मात्र, काही वेळातच कंपनीतील फर्नेस टँक (भट्टी) मध्ये अचानक एकापाठोपाठ तीन जोरदार स्फोट झाले. स्फोटाच्या वेळी कंपनीत सुमारे १०० ते १५० कामगार कार्यरत होते.



परिसरात घबराट, ३ जखमींवर उपचार सुरू


स्फोटांचा आवाज एवढा प्रचंड होता की, केवळ कारखान्यातील कामगारच नव्हे तर लगतच्या निवासी क्षेत्रातील नागरिकही भीतीपोटी घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि मदत पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, स्फोटाची भीषणता पाहाता जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


तारापूर एमआयडीसी परिसरात वारंवार होणारे छोटे-मोठे अपघात आणि स्फोटांच्या घटनांमुळे कामगारांच्या जीवाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या ताज्या घटनेमुळे एमआयडीसीतील कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणेवर आणि नियमांच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक कामगारांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन या स्फोटाच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण