UGC NET 2026 : UGC-NET जून 2026 ची 3 विषयांची परीक्षा पुन्हा होणार; NTA ने जाहीर केलं वेळापत्रक

मुंबई :  UGC-NET जून 2026 सत्रातील परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या 3 विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आढळलेल्या काही त्रुटींनंतर करण्यात आलेल्या तपासणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या विषयांच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.


UGC-NET परीक्षा झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील चुका आणि प्रश्नांच्या भाषांतराबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. तपासादरम्यान काही प्रश्नांमध्ये तथ्यात्मक आणि टायपिंगच्या चुका तसेच इंग्रजी आणि हिंदी भाषांतरात फरक आढळल्याचे समोर आले. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे देताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या.



विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि परीक्षेची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी, यासाठी NTA ने संबंधित 3 विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तसेच उर्वरित 84 विषयांच्या निकालावर या निर्णयाचा परिणाम होणार नसल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. त्यांच्या निकालाला विलंब होणार नाही.


पुनर्परीक्षेमुळे असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. पूर्वीप्रमाणेच विषयानुसार जागा आणि पात्रतेचे नियम लागू राहतील. परीक्षा केंद्राची माहिती आणि नवीन प्रवेशपत्र NTA कडून लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. ( UGC NET June 2026)


इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल. कॉमर्सची परीक्षा त्याच दिवशी दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत होणार आहे. समाजशास्त्राची परीक्षा 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत घेतली जाईल.


UGC-NET ही देशपातळीवरील परीक्षा असून ती वर्षातून दोनदा घेतली जाते. असिस्टंट प्रोफेसर, ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि पीएचडीसाठी विद्यार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि