BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील जुन्या कचरा कंत्राटदारांचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर मागील जानेवारी महिन्यात नवीन कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. या नवीन कंत्राटदारांचा मोबीलायझेशन कालावधीही आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदारांच्या गाड्या उपलब्ध झाल्यानंतर जुन्या कंत्राटदारांचा वाढीव कालावधी संपुष्टात आणला जात असतानाच नवीन कंत्राटदारांची वाहने अद्यापही महापालिकेला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिग दिसून येत आहे. एका बाजुला महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईला स्वच्छ राखण्यासाठी आणि कचरा टाकला जाणारी ठिकाणे कमी करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे नवीन कंत्राटदारांची वाहनेच उपलब्ध नसल्याने मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदारांच्या नेमणुकीनंतरही मुंबईतील परिस्थिती बदलण्याऐवजी वाढलेलीच पहायला मिळत आहे. (BMC News)



मुंबई महापालिकेच्यावतीने यापूर्वी ३ मे २०२८ रोजी नियुक्त केलेल्या १४ कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर प्रथम त्यांना सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यानंतर मुंबईतील २२ विभागांचे ८ गट करून ८ गटांसाठी सात वर्षांसाठी कंत्राटदार संस्थांची नेमणूक करण्यात आली. जानेवारी २०२६मध्ये या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून सप्टेंबर महिन्यापर्यंत यासर्व कंत्राटदारांची वाहने मनुष्यबळासह उपलब्ध होती असा ग्वाही प्रशासनाने दिली होती. परंतु आता जी दक्षिण व जी उत्तर विभागासह एन,एस अँड टी विभागांमध्ये तसेच इतर विभागांमध्ये नवीन कंत्राटदारांची वाहने व सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदारांची वाहने मनुष्यबळासह उपलब्ध झाल्यामुळे जुन्या कंत्राटदारांना वाढवून दिलेला कालावधी आता संपुष्टात आणला गेला आहे. (BMC News)



मात्र, नवीन कंत्राटदारांकडून अद्यापही पुरेशी वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक विभागांमधील कचरा उचलला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा झालेले पहायला मिळत आहे. एका बाजुला महापालिका आयुक्त यांच्या निर्देशांचे पालन करत कुठेही कचरा साचू द्यायचा नाही आणि कचऱ्याचे ढिग कुठेही दिसू नये तसेच कचरा साचणारी ठिकाणी कमी करा यासाठी प्रत्येक विभागाचा सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता प्रयत्न करत असला तरी प्रत्यक्षात कंत्राटदारांकडे पुरेशी वाहने नाहीत. आणि त्यामुळे कचरा उचलण्यात उशिर होतो, याचा फटका महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. पुरेशी वाहने नसणे आणि वाहन नसल्यास आकारला जाणारा दंड एवढा कमी आहे की एक वेळ गाडी देत नाही पण दंडाची रक्कम भरायला आम्ही तयार आहोत अशाप्रकारचा अविर्भाव कंत्राटदारांचा दिसून येत आहे. मुंबईकरांना आयुक्तांनी स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे स्वप्न दाखवले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विभागाचे सहायक आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी हे प्रयत्न करत असताना कंत्राटदारांकडून वाहने आणि त्याबाबतचे मनुष्यबळ पुरवले जात नसल्यामुळे मुंबईत कचऱ्याचे ढिग दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्तांना आपले स्वप्न पूर्ण करून मुंबईकरांना कचरामुक्त मुंबईचे दर्शन घडवण्यासाठी कंत्राटदारांचे प्रतिनिधी आणि महापालिका सहायक आयुक्तांसह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून याचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (BMC News)

Comments
Add Comment

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.